आमच्या श्रेणी

” आमची उत्पादने ही वनस्पती आधारित जैव कीटकनाशके आहेत जी भारतीय सेंद्रिय नियामक-NPOP व अमेरिकन नियामक-NOP यांनुसार सेंद्रिय प्रमाणित केलेली आहेत. युरोपियन नियमानुसार आमच्या उत्पादनांना सेंद्रिय शेतीसाठी परवानगी आहे. उच्च दर्जाच्या संशोधनाच्या आधारावर आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून आम्ही आमची सर्व उत्पादने प्रमाणिकृत निर्मिती केंद्रामध्ये निर्मित करतो.”

जैव कीटकनाशके

आमची उत्पादने ही वनस्पती आधारित जैव कीटकनाशके आहेत जी भारतीय सेंद्रिय नियामक-NPOP व अमेरिकन नियामक-NOP यांनुसार सेंद्रिय प्रमाणित केलेली आहेत. युरोपियन नियमानुसार आमच्या उत्पादनांना सेंद्रिय शेतीसाठी परवानगी आहे. उच्च दर्जाच्या संशोधनाच्या आधारावर आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून आम्ही आमची सर्व उत्पादने प्रमाणिकृत निर्मिती केंद्रामध्ये निर्मित करतो.

बॅलनस्टिक सिलिकॉन आधारित स्टिकर

बॅलनस्टिक हे एक उच्च दर्जाचे सिलिकॉन आधारित नॉन-आयनिक जे पानांच्या पृष्ठभागावर अत्यंत जलद पसरण्याची, चिकटून राहण्याची आणि पानांमध्ये वेगाने झिरपण्याची क्षमता असणारे तसेच सामू देखील संतुलित करणारे उत्पादन आहे.

बॅलनस्टिक हे 100% सेंद्रिय, स्प्रेडर आणि स्टिकर असून बुरशीनाशक, कीटकनाशक, जिवाणूनाशक, तणनाशक, उत्प्रेरक सूक्ष्मद्रव्ये आणि खते यांच्यासोबत वापरल्याने कीटकनाशकांची क्रियाशीलता अधिक वाढत असल्याचे निष्कर्षातून सिद्ध झाले.

नीमआधारित जैव-कीटकनाशके

ऑरगानीम हे एक उत्तम दर्जाचे निंबोळीपासून बनविलेले केंद्रीय कीटकनाशक बोर्ड (CIB) मान्यताप्राप्त जैव कीटक नाशक असून, भाजीपाला पिके, फळे, घरातील शोभेची झाडे, लॉन व फुल पिकांवर पर्णाहार करणारे कीटक आणि रस शोषक कीटकांवर अत्यंत प्रभावी आहे.

ऑरगानीम हे पर्यावरण पूरक जैव कीटकनाशक असल्याने सेंद्रिय शेतीसाठी अत्यंत योग्य आणि रासायनिक अवशेषमुक्त (रेसिड्यू फ्री) निर्यातक्षम उत्पादनासाठी शिफारसित केले जाते.

आमची अद्वितीयता

वनस्पती अल्कोलाइड पासून बनवलेली उच्च दर्जाची जैव कीटकनाशके.

01. के. बी. जैव-कीटकनाशके

वनस्पती अल्कोलाइड आधारित जैव-कीटकनाशके.

02. परिणाम सिद्धता

प्रयोगशाळांमध्ये आणि प्रात्यक्षिक क्षेत्रात चाचणी करून परिणामकारकता सिद्ध झालेले आहे.

03. 100% सेंद्रिय

सेंद्रिय शेतीसाठी व रासायनिक अवशेषमुक्त (रेसिड्यू फ्री) शेतीसाठी अत्यंत योग्य आणि शिफारस केलेले आहे.

आमची उत्पादने

Show All Products

शेतकऱ्यांचे अभिप्राय

चला आमचे प्रिय ग्राहक आमच्या बद्दल काय म्हणतात ते ऐकू या..!

“मी कुमार पोतेकर मु. पो. कुळकजाई ता-माण, जि-सातारा येथील शेतकरी असून सध्या माझ्याकडे कार्नेशन पिकाच्या लागवडी खाली साडेतीन एकर क्षेत्र आहे. माझ्या शेतात मला कार्नेशन पिकावर लालकोळी कीटकांच्या तीव्र प्रादुर्भावाचा सामना करावा लागला, म्हणून या किडीवर नियंत्रण मिळवण्यासाठी मी विविध कीटकनाशके आणि कोळीनाशके वापरली परंतु मला त्यातून समाधानकारक परिणाम मिळाला नाही. दरम्यानच्या काळात के. बी. बायो-ऑरगॅनिक्स कंपनीच्या तज्ञांनी माझ्याशी संपर्क साधला आणि त्यांनी संक्रमित क्षेत्राचे निरीक्षण केले व मला त्यांच्या “माईटो रेझ” या जैव-कोळीनाशक औषधाची शिफारस केली. “माईटो रेझ” या जैव-कीटकनाशकाचा वापर केल्यानंतर 48 तासात मला चांगला परिणाम मिळाला. आणि माझ्या निरीक्षणानुसार संक्रमित क्षेत्रातील जवळ-जवळ 90 ते 95 टक्के लाल कोळी कीटकांचा नाश झाला. त्यामुळे फुलांची गुणवत्ता वाढली व मार्केटमध्ये फुलांना चांगला दर मिळाला. ”.

श्री कुमार पोतेकर,
(कार्नेशन शेतकरी) कुळकजाई, ता- माण, जि-सातारा.

“मी रमेश काटे, रा. काटेवाडी, ता. बारामती, जि. पुणे. माझी 2 एकर द्राक्षाची शेती आहे. मी गेली वीस ते पंचवीस वर्षे द्राक्ष शेती करतो. मी माझ्या शेतीतील एक एकर क्षेत्रावर के. बी. बायो-ऑरगॅनिक्स कंपनीच्या “थ्रीप्स रेझ” या किटकनाशकाची फवारणी करून पाहिली आहे. वापराअंती मला असे आढळून आले की की 85 ते 90 टक्के फुलकिडे पूर्णपणे नियंत्रणात आले आहेत. या सोबतच मी दुसऱ्या प्लॉटवर रासायनिक औषधाचा वापर केला व दोन्ही मध्ये तुलना करता “थ्रीप्स रेझचा परिणाम चांगला होता. तसेच फुलकिड्यांबरोबर उडद्या भुंगेरेचे देखील नियंत्रण झाले होते. के. बी. बायो-ऑरगॅनिक्स उत्पादीत थ्रीप्स रेझचा परिणाम खूप चांगला आहे.”.

श्री. रमेश काटे,
रा. काटेवाडी, ता. बारामती, जि. पुणे.

“मी केतन नलवडे रा. साखरवाडी ता. फलटण, जि. सातारा येथील शेतकरी असून, माझी एक एकर भेंडी के. बी. बायो-ऑरगॅनिक्सच्या “फंगो रेझ” या उत्पादनाच्या डेमो साठी वापरली. “फंगो रेझच्या वापरामुळे मला भेंडीवरील भूरीवर पूर्णपणे नियंत्रण मिळाले. त्याचबरोबर नवीन बीजाणू निर्मिती ही थांबली. यामुळे मला निर्यातक्षम भेंडी उत्पादन मिळाले. या उत्पादन वापरामुळे मी खुश आहे.”.

श्री केतन नलवडे,
(भाजीपाला शेतकरी) रा. साखरवाडी ता. फलटण, जि. सातारा.

“मी गणेश घाडगे मु. पो. घाडगेमळा ता. फलटण जि. सातारा येथील शेतकरी असून, माझी बारा एकर जमीन भाजीपाला पिकाखाली आहे. आमच्या कित्येक पिढ्यांपासून आम्ही भाजीपाला शेती करतो. मी स्वतः कृषी पदवीधर असून माझासुद्धा शेतीमध्ये सहभाग असतो. शेती विषयक बोलायचे झाले तर वांग्याच्या पिकावर येणाऱ्या पांढरी माशी, मावा आणि तुडतुडे यांच्या प्रादुर्भावामुळे मी हैराण झालो होतो. त्यामुळे गेल्या अनेक वर्षापासून यावर आम्ही वेगवेगळ्या प्रकारची औषधे वापरून बघितली पण कोणत्याच औषधाचा समाधान कारक परिणाम मिळाला नाही. काही आठवड्यांपूर्वी के. बी. बायो-ऑरगॅनिक्स कंपनीतील तज्ञांनी माझ्या शेतीला भेट देऊन, केलेल्या निरीक्षणाअंती मला त्यांच्या कंपनीद्वारे उत्पादीत “पेस्टो रेझ” हे कीटकनाशक वापरण्याचा सल्ला दिला. पेस्टो रेझच्या वापरानंतर मला उत्कृष्ट परिणाम मिळाला. त्याचबरोबर रसशोषक कीटकांपासून 48 तासांमध्ये मुक्ती मिळाली. एक शेतकरी तसेच कृषी पदवीधर म्हणून मला असे सांगायचे आहे की, “पेस्टो रेझ” हे मी आजपर्यंत रसशोषक किटकांसाठी वापरलेल्या उत्पादनांपैकी की एक उत्कृष्ट उत्पादन आहे. यामुळे मला सेंद्रिय भाजीपाला पिकवण्यासाठी मदत झाली.”.

श्री गणेश घाडगे,
(भाजीपाला शेतकरी),घाडगेमळा ता. फलटण जि. सातारा.

“”मी अरविंद निंबाळकर रा. कांबळेश्वर ता. बारामती जि. पुणे येथील शेतकरी असून, माझ्या एकूण बारा एकर भाजीपाला क्षेत्रापैकी सहा एकर क्षेत्र हे रंगीत ढोबळी मिरची या पिकाखाली आहे. काही आठवड्यांपूर्वी के. बी. बायो-ऑरगॅनिक्स कंपनीमधील तज्ञांनी माझ्या शेतीला भेट दिली आणि “पेस्टो रेझ” हे जैव कीटकनाशक कसे वापरायचे याविषयी माहिती दिली. पेस्टो रेझच्या वापरानंतर सर्व रसशोषक कीटक उदा. पांढरी माशी, मावा आणि तुडतुडे इत्यादींवर जबरदस्त परिणाम मिळाला. पेस्टो रेझ च्या वापरापूर्वी सर्वत्र पिकाची वाढ खुंटलेली तसेच पाने वळलेली होती. परंतु पेस्टो रेझच्या वापरानंतर शेंड्यातून पाने फुटायला लागली. तसेच पिकाची वाढ ही चांगली झाली..

श्री अरविंद निंबाळकर,
(भाजीपाला शेतकरी), रा. कांबळेश्वर ता. बारामती जि. पुणे.

“मी गणेश गोळे रा. गोळेवाडी, ता. महाबळेश्वर, जि. सातारा येथील स्ट्रॉबेरी उत्पादक शेतकरी आहे. माझी एकूण वीस एकर जमीन स्ट्रॉबेरी पिकाखाली आहे. माझा संपूर्ण प्लॉट भूरी रोगामुळे ग्रासला होता. प्रत्येक वर्षी हाच प्रॉब्लेम मला यायचा यासाठी मी अनेक बुरशीनाशके फवारली पण कोणत्याच औषधाने मला समाधानकारक परिणाम मिळाला नाही. याउलट रासायनिक औषधांमुळे फळांची गुणवत्ता ढासळली. मध्यंतरी के. बी. बायो-ऑरगॅनिक्स कंपनीच्या तज्ञांनी माझ्या शेतीला भेट दिली व पाहणी केल्यानंतर मला माझ्या एक एकर प्लॉटवर “फंगो रेझ” हे त्यांचे उत्पादन प्रात्यक्षिक म्हणून वापरण्याचा सल्ला दिला. “फंगो रेझ” वापरानंतर ४८ तासांत भुरीवर चांगला परिणाम दिसुन आला. त्याच बरोबर फुलांची वाढलेली संख्या आणि फळांची वाढलेली गुणवत्ता यांची रासायनिक बुरशीनाशके वापरलेल्या प्लॉट बरोबर तुलना केली असता सहज ओळखण्या जोगा परिणाम दिसत होता. मी खरंच फंगो रेझच्या वापरामुळे समाधानी आहे. रेसिड्यू फ्री शेतीसाठी गुणवत्तापूर्ण अशा के. बी. बायो-ऑरगॅनिक्सच्या उत्पादनामुळे मी आता स्ट्रॉबेरी निर्यात करण्याचा विचार करत आहे.”.

श्री गणेश गोळे,
रा. गोळेवाडी, ता. महाबळेश्वर, जि. सातारा.
Kay Bee

Certified By


Kay Bee
ISO
Kay Bee
CIBRC
Kay Bee
ECOCERT

Marketing office-


Ganga collidium, office No- 119/120, Gangadham Chowk, Pune- 37, Maharashtra 411037

 

Quick Links


  • मुखपृष्ट
  • आमची उत्पादने
  • आम्हीच का?
  • आमच्या बद्दल
  • चित्रे
  • भविष्य
  • मराठी (मराठी)
    • English (English)

Follow us


  • facebook
  • instagram
  • youtube
  • linkedin
© Copyright - Kay Bee
  • English (English)
  • मराठी